फलटण चौफेर दि 22 जुलै 2025
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने फलटण येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे आयोजन खासदार मा. रणजितसिंह नाईक निंबाळकर (माढा लोकसभा) व आमदार आ. सचिन पाटील (फलटण-कोरेगाव विधानसभा) यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात मंगळवार, 22 जुलै 2025 रोजी सकाळी 8 वाजता या रक्तदान शिबिराचा शुभारंभ होणार आहे या उपक्रमात महायुतीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.