Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्यातील 2017 ची जिल्हा परिषद निवडणूक – राजकीय संघर्ष आणि परिणाम 2025 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीत मोठे बदल

 


फलटण चौफेर दि  20 जुलै 2025 :

2017 साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत फलटण तालुक्यात राजकीय घमासान पाहायला मिळाले होते. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(राजे गट) आणि राष्ट्रीय काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत झाली होती. तालुक्यातील राजकीय रंगमंचावर विधान परिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्यांचे बंधू श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी राजे गटाकडून तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील हे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीमधून  सक्रिय होते. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा सरळ मुकाबला सर्वच गटांमध्ये रंगला होता.



सात गटांतील लढती आणि निकाल


२०१७ मध्ये फलटण तालुक्यातील एकूण सात जिल्हा परिषद गटांमध्ये झालेल्या निवडणुकीत पुढीलप्रमाणे निकाल लागले होते :


साखरवाडी गट

राष्ट्रवादीच्या श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसच्या सौ. रेखा संदीप शिंदे यांचा पराभव करत विजय मिळवला.


तरडगाव गट

राजे गटाचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकरी संघटनेचे अमोल खराडे यांचा पराभव केला.


हिंगणगाव गट

धैर्यशील (दत्ता) अनपट यांनी काँग्रेसचे धनंजय साळुंखे पाटील यांचा पराभव करत  विजय मिळवला.


गिरवी गट

जिजामाला नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे रामदास कदम यांचा पराभव केला.


कोळकी गट

राजे गटाचे माणिकराव सोनवलकर यांनी काँग्रेसचे जयकुमार शिंदे यांचा पराभव केला.


गुणवरे गट

राजे गटाचे विश्वासराव गावडे यांनी काँग्रेसचे मनोज तात्या गावडे यांचा पराभव केला.


विडणी गट

कांचनमाला  निंबाळकर (राजे गट) यांनी काँग्रेसच्या उमादेवी कापसे यांचा पराभव केला.


2019 नंतर बदललेली राजकीय समीकरणे


2019 नंतर तालुक्याच्या राजकारणात मोठा बदल झाला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला व माढा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनीही काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.या घडामोडींमुळे 2017 मध्ये असलेली राष्ट्रीय  काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची थेट लढत आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी राजे गट अशीच होणार आहे  मात्र आगामी निवडणूक वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. काँग्रेसने गमावलेले नेतृत्व आणि भाजपमध्ये दाखल झालेल्या प्रमुख नेत्यांमुळे राजकीय चित्र संपूर्णपणे पालटले आहे. त्यामुळे येणारी निवडणूक हा राजकीय ताकदपरीक्षेचा नव्याने रंगणारा रणसंग्राम ठरणार आहे.


2025 ची निवडणूक : नव्या गटासह आठ गटांची  रचना


येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत फलटण तालुक्यात एकूण आठ गट असणार आहेत. नव्याने समाविष्ट झालेला वाठार निंबाळकर हा वाढीव गट निर्माण झाला असून, यामुळे स्थानिक राजकारणात नव्या गणितांची भर पडली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.