फलटण चौफेर दि २१ जुलै २०२५
आज दि. २१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने चायनीज व नायलॉन दोऱ्याविरोधात विशेष गस्त राबवण्यात आली. जाधववाडी रोडवरील साई मंदिरासमोरील मैदानात काही लहान मुले पतंग उडवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यावेळी पोलीसांनी दोऱ्यांची तपासणी करण्यासाठी पुढे जाताच संबंधित मुलांनी पतंगाचे दोऱ्याचे रीळ जागेवरच टाकून पळ काढला. घटनास्थळी दोन रीळ सापडल्या असून, त्यापैकी एक रीळ नायलॉन दोऱ्याची असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर रीळ पोलीसांनी जप्त केली असून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. संबंधित मुलांचा शोध सुरु आहे.या गस्तीमध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री. अंकुश इवरे, महिला पोलीस नाईक दीपाली अलगुडे व पोलीस शिपाई प्रियांका नरुटे यांनी सहभाग घेतला.नायलॉन दोऱ्यामुळे दरवर्षी अनेक अपघात होतात. त्यामुळे अशा धोकादायक दोऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत ड्रोनच्या सहाय्याने देखील लक्ष ठेवण्यात येत आहे.