फलटण चौफेर| दि. 18 जुलै 2025
लोणंद पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने हरवलेले मोबाईल शोधून काढत, एकूण ₹3,07,499/- किंमतीचे 15 मोबाईल फोन मूळ तक्रारदारांना परत केले आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी जून व जुलै 2025 या कालावधीत करण्यात आली असून, पोलीस दलाच्या प्रामाणिकतेचे व तांत्रिक कौशल्याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. राहुल धस (फलटण विभाग) यांचे मार्गदर्शन व श्री सुशिल बी. भोसले (सहाय्यक पोलीस निरीक्षक, लोणंद पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.गुन्हे प्रकटीकरण पथकाने CIR पोर्टल, सीडीआर विश्लेषण, IMEI ट्रॅकिंग आणि तांत्रिक माहितीच्या आधारे राज्यातील तसेच परराज्यातील मोबाईल धारकांशी संपर्क साधत तपास पुढे नेला. अनेक दिवसांपासून हरवलेले मोबाईल ट्रेस करून अखेर मूळ मालकांना परत करण्यात आले.आज लोणंद पोलीस ठाण्यातील आवारात विशेष कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुशिल भोसले यांच्या हस्ते तक्रारदारांना मोबाईल सुपूर्त करण्यात आले.या शोधमोहीमेत खालील अधिकाऱ्यांचा व पोलीस कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा होता:पो. उपनिरीक्षक: ज्योती चव्हाण, सहायक फौजदार: विजय पिसाळ, धुमाळ पोलीस हवालदार: नितीन भोसले, संतोष नाळे, धनाजी भिसे, अतुल कुंभार, मिसाळ,पोलीस नाईक व कॉन्स्टेबल: सतीश दडस, बापुराव मदने, विठ्ठल काळे, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, शेखर शिंगाडे, सुनील नामदास, सचिन कोळेकर, केतन लाळगे, अमिर जाधव, सूरज सावंत,महिला पो.कॉ.: स्नेहल कापसे, राणी कुदळे,पो.कॉ.: यादव, गोविंद आंधळे