Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जयकुमार गोरे आणि माझं वैयक्तिक वैर नाही – श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर योग्य वेळी अधिकच बोलणार!



फलटण चौफेर दि २५ जुलै

 राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि माझं वैयक्तिक वैर नाही. त्यांच्या मनात आहे की मी सगळं त्यांच्याविरुद्ध करतो. देव त्यांना सुबुद्धी देवो, माझ्या शुभेच्छा त्यांना आहेत. मंत्री म्हणून गोरगरीबांची कामे करा, एवढा सल्ला माझं वय पाहता मी देऊ शकतो. माझं राज्यात कुणाशीही वाकडं नाही, मात्र जयकुमार गोरे यांच्या मनात माझ्याबद्दल जी अड्डी आहे त्याबद्दल योग्यवेळी मी नक्की  बोलेन कोळकी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विविध विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात श्रीमंत रामराजे बोलत होते


रामराजे पुढे म्हणाले की, मी जातपात मानत नाही आणि कधी मानणार ही नाही सर्वसामान्य जनतेकडे मताचे व जातीचे गट्टे म्हणून कधीही आम्ही पाहत नाही जे कार्यकर्ते सोडून गेले आहेत त्यांच्यासाठी काय कमी केले हे त्यांनाच माहिती मात्र त्यांना माझ इतकच सांगण आहे की जिथे तुम्ही गेला आहात तिथून परतीचा मार्ग नाही.  विरोधकांनी एकही कार्यकर्ता तयार केला नाही. कॉन्ट्रॅक्टर व दोन नंबर धंदेवाल्यांना तसेच काही मोठ्या पुढार्‍यांना तुमचा भविष्यात 'आगवणे' करू म्हणून दमदाटी करून पक्षात घेतलं जात आहे. अशांचा तिरस्कार करण्यापेक्षा तुम्ही त्यांना घाबरत आहात हे मला खटकतंय.कोळकीच्या रस्त्यांवर खून पडले आहेत याबाबत योग्य वेळी नक्की बोलणार आहे आमच्या विचारांशी  पटत नसेल तर त्यांनी खुशाल सोडून जावं.

संजीवराजे म्हणाले, "कोळकी ग्रामपंचायतीने सौरऊर्जेवर आधारित नळ पाणीपुरवठा योजना सुरू केली असून ही योजना राबवणारी ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.कोळकी ग्रामपंचायतीला आर्थिक अडचणी होत्या; काटकसर करून विकासाची सांगड घालण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीत राजे गटातून निवडून आलेले सदस्य सोडून गेले, पण अपक्ष सदस्य तटस्थ राहिले. सचिन रणवरे यांचे किती भल केले आहे, हे रामराजेंनाच माहीत आहे.विरोधकांकडून व्यावसायिकांवर दबाव टाकला जात आहे, पण तुमचा योग्य व कायदेशीर व्यवसाय बंद पडू देणार नाही. आम्ही चांगली कामे करतो म्हणून आम्ही नकारात्मक होऊ शकत नाही असा समज कोणी करून घेऊ नये वेळ आल्यास आम्हालाही आक्रमकता दाखवता येते हे विसरू नका. विकासकामात आडवा येणाऱ्यांना आडवा  करण्यासाजी ताकद आमच्यात आहे. तालुक्याचे पाणी दुसरीकडे जाणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेतली आहे.कार्यक्रमात फलटण-कोरेगावचे माजी आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर, श्रीराम बँकेचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, धनंजय पवार, कोळकीचे सरपंच-उपसरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी बोलताना रामराजे यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत झालेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. कार्यक्रमास फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी राजे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.