फलटण चौफेर दि 28जुलै 2025
आज दिनांक 28 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता वीर धरणातून निरा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून, आता एकूण 32663 क्यूसेक्स पाणी सोडले जात आहे.
धरण परिसरातील पावसाचे प्रमाण व पाण्याची आवक लक्षात घेता, कोणत्याही क्षणी विसर्गात वाढ अथवा घट केली जाऊ शकते. त्यामुळे नीरा नदीच्या दोन्ही तीरावरील गावांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन निरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.