फलटण चौफेर दि. २८ जुलै २०२५
बारामती शहरातील महात्मा फुले चौक परिसरात काल दि २८ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरून जात असताना डंपरच्या चाकाखाली येऊन ओंकार आचार्य (रा. सणसर, ता. इंदापूर – सध्या मोरगाव रोड, बारामती) आणि त्यांच्या दोन लहान मुली सई (वय अंदाजे १०) व मधुरा (वय अंदाजे ४) यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सकाळी आचार्य कुटुंबीय दुचाकीवरून मोरगाव रोडमार्गे शहरात जात असताना वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की दुचाकी थेट डंपरच्या चाकाखाली गेली. अपघातात ओंकार आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या दोन मुली यांना घटनास्थळावरील उपस्थित त्यांनी रुग्णालयात दाखल केले असता उपचारपूर्वीच त्यांचा सुद्धा मृत्यू झाला पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. डंपर चालकाविरुद्ध बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असूनया दुर्घटनेने बारामती शहर तसेच सणसर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.