फलटण चौफेर – १२ जुलै २०२५
निरा खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी उसंत घेतली आहे तरीसुद्धा चार प्रमुख धरणांमध्ये एकूण ३५.८४४ टीएमसी म्हणजेच ७४.१७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी केवळ १२.४२८ टीएमसी (२५.७२%) साठा होता, त्यामुळे यंदा साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
धरणांची सविस्तर स्थिती पुढीलप्रमाणे: भाटघर धरण:
फक्त २ मिमी पाऊस, एकूण साठा १८.४४७ टीएमसी (७८.४९%). सध्या इनफ्लो २८९ क्युसेक्स.नीरादेवघर धरण:९ मिमी पाऊस, साठा ६.८४३ टीएमसी (५८.३४%), इनफ्लो ८१ क्युसेक्स.वीर धरण:पाऊस नाही, तरीही साठा ८.१४४ टीएमसी (८६.५७%). इनफ्लो २८३ क्युसेक्स.निरा डावा कालवा – ६०० क्युसेक्स व निरा उजवा कालव्यामधून – १२०४ क्युसेक्स आवर्तन सुरू आहे गुंजवणी धरण:३ मिमी पाऊस, साठा २.४०८ टीएमसी (६५.२७%). इनफ्लो २२ क्युसेक्स, वापरासाठी २५० क्युसेक्स पाणी सोडले. एकूण इनफ्लो: ०.९३५ टीएमसी एकूण साठा: ३५.८४४ टीएमसी (७४.१७%)
पावसाची उसंत असूनही जलसाठा समाधानकारक असल्याने नागरिकांना तातडीची चिंता नसली तरी पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होण्यासाठी लवकरच पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे.
—