Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खामगावात नागरिक मूलभूत हक्कापासून वंचित

 


फलटण चौफेर दि १८ जुलै २०२५

खामगाव (ता. फलटण) येथील फुलेनगरलगतच्या लोकवस्तीत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली असून, पावसाळा सुरू होताच परिसरात चिखल व साचलेल्या पाण्यामुळे ये-जा करणे कठीण झाले आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.त्यामुळे येथे राहणाऱ्या कदम व निंबाळकर व इतर कुटुंबातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे


वाढत्या लोकसंख्येनुसार पायाभूत सुविधांची गरज असताना, ग्रामपंचायत प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. फुलेनगर परिसरालगत राहणारे नागरिक अनेक वेळा ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे तक्रार करूनही रस्त्याची दुरवस्था तशीच आहे. परिणामी, नागरिकांना चिखलातून, साचलेल्या पाण्यातून चालत कामावर, शाळेत अथवा दवाखान्यात जावे लागत आहे.या विषयावर ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी जबाबदारी सरपंचावर ढकलली.या सर्व प्रकारामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. खामगाव ग्रामपंचायतीने नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी निगडित अशा समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. तत्काळ रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील रहिवाशांमधून होत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.