विडणी(योगेश निकाळजे) - श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज संजिवन समाधी उत्सव सोहळ्यानिमित्त विडणी येथे अखंड हरिनाम सप्ताहा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विडणी ता.फलटण येथील श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज यांच्या मंदिरामध्ये गुरुवार दि.17 जुलै ते बुधवार दि.23 जुलै या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला असून यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये आज गुरुवारी सकाळी 8 वाजता श्रीक्षेत्र अरण येथून पुण्यज्योतीचे आगमन झाले असून रात्री 9 ते 11 वाजता ह.भ.प. प्रा. श्री अच्युत महाराज शिंदे उद्धट तावशी यांचे कीर्तन होणार आहे शुक्रवार दिनांक 18 रोजी रात्री 9 ते 11 वाजता ह.भ. प. श्री. महादेव महाराज शिंदे पिसेवाडी ,वेळापूर यांचे कीर्तन होणार आहे शनिवार दिनांक 19 जुलै रोजी रात्री नऊ वाजता श्री ह. भ .प. चैतन्य महाराज बारवकर निमगाव यांचे कीर्तन होणार आहे रविवार दि. 20 रोजी रात्री 9 वाजता ह. भ.प. श्री सुनील महाराज माने तावशी यांचे कीर्तन होणार आहे सोमवार दि. 21 जुलै रोजी रात्री 9 वाजता ह.भ.प. श्री महंत अनंतदास महाराज लिंगायत शिवडी ,मुंबई यांचे कीर्तन होणार आहे मंगळवार दिनांक 22 रोजी रात्री 9 वा. ह.भ.प. श्रीकांत महाराज पालकर देवाचे आळंदी पुणे यांचे कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी सूर्योदयावेळी श्रींच्या समाधीवरती पुष्पवृष्टी होणार आहे,सकाळी 10 ते 12 वाजता ह.भ.प.श्री काकासाहेब महाराज पहाणे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे , दुपारी 3 वाजता श्रींची दिंडी व पालखी सोहळ्यासह गावातून भव्य अशी मिरवणूक निघणार आहे व सायंकाळी 5 वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आहे,दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहामध्ये रोज पहाटे 4 ते 6 श्रींची पूजा काकड आरती भजन सकाळी 8 ते 10 पोथी वाचन सायंकाळी 6 ते 7 वाजता हरिपाठ होणार असून या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.