फलटण चौफेर दि २८ जुलै २०२५
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटण येथील चतुर्थ वर्षातील कृषी कन्यांनी बोर्डो मिश्रण तयार करण्यावर प्रात्यक्षिक दिले. कृषीकन्यांनी बोर्डो मिश्रण (Bordeaux mixture) या विषयी माहिती दिली. बोर्डो मिश्रण हे एक बुरशीनाशक आहे, जे शेतीत वापरले जाते. ते कॉपर सल्फेट (copper sulfate) आणि चुना (lime) पाण्यात मिसळून तयार केले जाते.
बोर्डो मिश्रण वापरण्याचे फायदे:
बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवते, नैसर्गिकरित्या उपलब्ध घटकांपासून तयार होते, शेतीत मोठ्या प्रमाणावर वापरले जाते, सेंद्रिय शेतीतही वापरले जाते. हे मिश्रण फळबाग, भाजीपाला आणि इतर पिकांवरील डाउनी मिल्ड्यू, पावडर मिल्ड्यू आणि इतर बुरशीजन्य रोगांवर प्रभावी आहे. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषी कन्यां कुमारी जाधव सृष्टी हनुमंत,कांबळे सानिका अमोल, काटकर स्नेहा संजयकुमार, कदम रोहिणी लक्ष्मण, मलगुंडे प्रतीक्षा संजय, कांबळे प्रणोती सुनील, लडकत श्रेया संजय या कृषी कन्या सहभागी झाल्या होत्या.