फलटण चौफेर दि २८ जुलै २०२५
-फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ"राहुरी संलग्न' व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषी कन्यांनी "ग्रामीण जागृती कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६" कार्यक्रमांतर्गत दिले बोर्डो मिश्रण निर्मितीचे प्रात्यक्षिक.
बोड्रॅक्स मिश्रण म्हणजे काय? मोरचुद (कॉपर सल्फेट), चुना (कॅल्शियम हायड्रॉक्साइड) आणि पाणी यांच्या प्रमाणशीर मिश्रणास बोड्रॅक्स मिश्रण असे म्हणतात.प्रा. पी.ए. मिलार्डेट यांनी १९८२ मध्ये प्रथम मोरचूद आणि चुना यांच्या मिश्रणाचा फ्रान्समध्ये द्राक्षांवरील केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी वापर केला. तेव्हापासून सर्वत्र अनेक पिकांवर विशेषतः भाजीपाला आणि फळबागांवर पडलेल्या बुरशीजन्य रोगांवर एक प्रभावी उपाय म्हणून बोर्डों मिश्रणाचा उपयोग केला जात आहे.भारतात फळपिकांपासून मिळणाऱ्या उत्पादनात लिंबुवर्गिय फळपिकांचा फार 'मोठा वाटा आहे. त्यात प्रामुख्याने लिंबूवर्गीय फळपिकांवर येणारे विविध रोग जसे खैर्या,विषाणुजन्य मंदन्हास, जलदन्हास बुरशीजन्य पायकुज, मुळजुक, शेंडेमर आणि डिंक्या होय. ह्या बुरशीजन्य रोगापासून बचावात्मक उपाय म्हणजेच बोर्डो पेस्ट किंवा बोर्डों मिश्रण यांचा उपयोग करणे होय.पिकांवर येणाऱ्या निरनिराळ्या रोगांपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी बोर्डों मिश्रण व बोर्डो मलम याचा वापर फायदेशीर आहे.या उपक्रमात शेतकर्यांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु.डि.चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी.निंबाळकर सर,कार्यक्रम अधिकारी प्रा.सुरेश साळुंखे,कार्यक्रम समन्वयक प्रा.निलिमा धालपे,कार्यक्रम अधिकारी प्रा.नितिशा पंडित आणि विषय मार्गदर्शक प्रा.पी.व्ही.भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या अश्विनी महानवर,पायल नाळे,वैष्णवी चांदगुडे,निधी कोडापे, आविष्का शिंदे,प्रचिती कुदळे,सेजल दांगट यांनी हा कार्यक्रम पार पडला.