Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सुरवडी येथे वीज वाहक तार पडून गाईचा मृत्यू शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान; नुकसान भरपाईची मागणी




फलटण चौफेर दि १२ जून २०२५

दि ११ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसासह वाऱ्यामुळे सुरवडी गावात वीज वाहक तार तुटून जमिनीवर पडली. या दुर्घटनेत वामन भीमराव शिंदे यांच्या गाईचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.


मात्र शिंदे यांची ही गाई २० लिटर दुध देत असल्याचे व तिची अंदाजे किंमत ८० हजार रुपये असल्याचे शिंदे यांनी सांगितले या अपघातामुळे त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा फटका बसला आहे. त्यांनी प्रशासनाकडे व वीज वितरण कंपनीकडे तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.ही घटना घडल्यावर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीने त्वरित खराब वीज वाहिन्यांची दुरुस्ती करावी व अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी  मागणी केली जात आहे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.