Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात गरजूंना दिलासा : ४० लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

 



फलटण चौफेर दि २१ जून २०२५  महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत फलटण तहसील कार्यालयाच्यावतीने "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर" फलटण तालुक्यातील पिंपळवाडी, साखरवाडी, होळ गावांमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या शिबिरात विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.



शिबिरामध्ये उत्पादन, अल्पभूधारक, भूमिहीन, नॉन क्रीमीलेयर, जात प्रमाणपत्र, संजय गांधी योजना लागू करणे, शेतकरी नाव नोंदणी, ७/१२ उतारा दुरुस्ती, Agristack फॉर्म भरून देणे, नवीन नोंदी करणे, शेतकरी योजना अर्ज, विविध दाखले इत्यादींचे वितरण व मार्गदर्शन करण्यात आले.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साखरवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. अपर्णा दत्तात्रय बोडरे होत्या. त्यांच्या सोबत प सं मा.सभापती  शंकरराव मांडकर, मा. उपसरपंच अक्षय रूपनवर, पो.पा. सौ. सोनाली पवार, पो.पा. सौ. भोसले तसेच पुरवठा विभागाचे अधिकारी वर्ग, महसूल मंडलाधिकारी व्ही व्ही गाडे,महसूल विभागाच्या विविध सजांचे अधिकारी, महसूल सेवक आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या  संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



या शिबिराचा पिंपळवाडी, साखरवाडी, होळ गावातील सुमारे ४० गरजूंनी लाभ घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी थेट लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांचे प्रलंबित दाखले तातडीने उपलब्ध होऊन मोठा दिलासा मिळाला.शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल साखरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. अपर्णा दत्तात्रय बोडरे यांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच सहभागी झालेल्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.