फलटण चौफेर दि २०जून २०२५
श्री दत्त इंडिया कंपनीचे संचालक जितेंद्र धारू यांच्या ४७ व्या वाढदिवसर्वनिमित्त ओंकार भोसले मित्र मंडळ साखरवाडी, यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक उपक्रम राबविण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रमशाळा, साखरवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अल्पोपहार वाटप करण्यात आले.या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, लेखन साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामध्ये ओंकार भोसले, श्री दत्त इंडिया कंपनीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप,फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले,ग्रापंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून सर्व उपस्थितांच्या मनाला समाधान लाभले तसेच समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी आवश्यक ती मदत मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे ओंकार भोसले यांनी सांगितले.या कार्यक्रमात मंडळाचे सर्व सदस्य, स्थानिक ग्रामस्थ, तसेच पालक वर्ग उपस्थित होते. या प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा मानस मंडळाने व्यक्त केला आहे.