Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विडणीच्या उपसरपंचपदी भाजपच्या सौ.मनिषा दिपक नाळे यांची बिनविरोध निवड



विडणी (योगेश निकाळजे)- विडणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या सौ.मनिषा दिपक नाळे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे.


      फलटण तालुक्यात विकासकामात अग्रेसर असलेल्या विडणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची आज निवड करण्यात आली असून यामध्ये भाजपप्रणीत विडणी विकास आघाडीच्या सौ.मनिषा दिपक नाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे दरम्यान ग्रामपंचायतीच्या शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या उपसरपंचांसह 8 ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरल्यामुळे राजेगटाच्यावतीने उपसरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल केला नसल्याने सौ.मनिषा अभंग यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


      गेल्या अडीच वर्षात विकासकामे करताना विरोधकांनी अनेक अडचणी आणल्या मात्र तरीही गावात करोडो रुपयांची कामे केली असून आता तर उपसरपंचही आमचाच झाल्याने पुढील अडीच वर्षात डबल इंजिनच्या साह्याने विडणी गावाचा कायापालट करणार असल्याचे मत यावेळी विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी व्यक्त केले.


      निवडणूक अधिकारी म्हणून मंडलाधिकारी कैलास जाधव व ग्रामविकास अधिकारी अंकूश टेंबरे यांनी काम पाहिले,निवडीबदल मनिषा नाळे यांचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे,मा.खा. रणजितसिंह निंबाळकर,आमदार सचिन पाटील, विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग, चंद्रकांत नाळे, किसनराव टिळेकर, केशवराव नाळे,शरद नाळे, नंदकुमार अभंग तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.