फलटण चौफेर दि. २० जून २०२५
निरा खोऱ्यात मागील चोवीस तासांत दमदार पावसाने हजेरी लावली असून, चारही प्रमुख धरणांमध्ये मिळून ३.५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे जलसाठ्यात समाधानकारक वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
धरणानिहाय सविस्तर माहिती:
भाटघर धरण:
काल ४८ मिमी पावसाची नोंद झाली असून, एकूण साठा ३.३८४ टीएमसी (१४.४०%) झाला आहे. धरणात १२१४ क्यूसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे.
निरा देवघर धरण:
येथे ६८ मिमी पाऊस पडला असून, सध्याचा साठा १.९७० टीएमसी (१६.७९%) आहे. धरणात २४२ क्यूसेक्सने पाणी येत आहे.
वीर धरण:
काल २० मिमी पावसाची नोंद झाली असून, साठा ६.९०१ टीएमसी (७३.३५%) झाला आहे. धरणात १५३४ क्यूसेक्सने पाणी येत आहे. सध्या कोणताही विसर्ग नाही.
गुंजवणी धरण:
येथे सर्वाधिक १३६ मिमी पाऊस झाला असून, साठा १.३६४ टीएमसी (३६.९७%) आहे. धरणात २६३ क्यूसेक्सने पाण्याची आवक आहे.
सध्याचा एकूण साठा: चारही धरणांमध्ये एकत्रित साठा १३.६२१ टीएमसी (२८.१८%) झाला आहे.एकूण नवीन पाण्याची आवक ३.२५३ टीएमसी इतकी झाली आहे.मागील वर्षी याच दिवशी साठा ४.६८४ टीएमसी (९.६९%) इतका होता. चोवीस तासांत पावसाच्या जोरामुळे एकूण ३.२ टीएमसीच्या आसपास साठ्यात वाढ झाली आहे. पावसाचे हे प्रमाण पुढील काही दिवस असेच राहिल्यास निरा खोऱ्यातील जलसाठ्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.