फलटण चौफेर, दि. ११ जून २०२५
– फलटण तालुक्यात आज संध्याकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह ग्रामीण भागात सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून हवामान ढगाळ होते. आज दिवसभर उष्णता आणि दमट वातावरणानंतर संध्याकाळी अचानक काळोख दाटून आला आणि पावसाच्या सरी कोसळू लागल्या. विजांचा लखलखाट आणि कडकडाट यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या शेती मशागतीच्या कामांना योग्य वापसा झालेला नसल्याने अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक भागांमध्ये पेरण्यांची तयारी सुरु होती, मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. पावसाच्या या सरींमुळे शेतकऱ्यांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत