फलटण चौफेर २० जून २०२५
भारतातील साखर उद्योगातील अग्रगण्य कंपनी श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगसमूहाचे संचालक जितेंद्र धारू यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि १९ रोजी साखरवाडी येथील कारखाना कार्यस्थळावर गणपती मंडप येथे कंपनीच्या श्री गणेशोत्सव मंडळ व फलटण तालुका साखर कामगार युनियन यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये २५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला
दिनांक १९ रोजी सकाळी ९ वाजता कंपनीचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचा प्रारंभ करण्यात आला यावेळी टेक्निकल हेड आमोद पाल,चीफ इंजिनिअर अजित कदम,कंपनीचे केन मॅनेजर सदानंद पाटील,को जन मॅनेजर दीपक मोरे,कंपनीचे एच आर संजय भुसनर ,उत्पादन मॅनेजर नितीन नाईक नवरे,सुरक्षा अधिकारी गणेश मोटे,डेप्युटी चीफ इंजिनिअर नितीन रणवरे, किशोर फडतरे,पी पी बॅगचे सूरज बांदल,विशाल साखरे,सुरक्षा अधिकारी अजय कदम, डिस्टलरी अधिकारी प्रमोद नेवसे,बाबासाहेब जाधव,शिल्पेश जाधव,फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले,सुहास गायकवाड, पोपट भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, संजय जाधव,पै संतोष भोसले, सुरेश नाना भोसले,महेश भोसले,महेश पवार, श्री गणेशोत्सव मंडळ(श्रीदत्त इंडिया) अध्यक्ष गोरख भोसले,केन यार्ड सुपरवायझर एस के भोसले,ट्रान्सपोर्ट इनचार्ज नितीन भोसले, कार्यवाहक शहाजी घाटगे, ज्ञानेश्वर बोडरे, मनोज भोसले,विजय माडकर,दिलीप भोसले, अरुण इंगळे, दत्तात्रय जाधव,जनार्धन जगताप,बाळासाहेब भोसले कंपनीचे सर्व कामगार,अधिकारी वर्ग व कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरात उस्फुर्त सहभाग घेतला