Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निरा खोऱ्यात धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट साठा; पावसाचा जोर कायम



फलटण चौफेर दि १९ जून २०२५

निरा खोऱ्यातील धरणांमध्ये यंदा समाधानकारक पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, चारही प्रमुख धरणांमध्ये एकूण १०.३८८ टीएमसी (२१.४९%) साठा असून, हा साठा गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. मागील वर्षी याच दिवशी केवळ ४.६८४ टीएमसी (९.६९%) साठा होता.



धरणानुसार पाणीसाठ्याची स्थिती:

भाटघर धरणात आज २५ मिमी पावसाची नोंद झाली असून, एकूण साठा २.१७० टीएमसी (९.२३%) आहे. धरणात सध्या १९६ क्युसेक्स वेगाने पाणी येत आहे.

नीरा देवघर धरणात आज ७७ मिमी पाऊस झाला असून, एकूण साठा १.७४८ टीएमसी (१४.९०%) झाला आहे. धरणात २२३ क्युसेक्स आवक आहे.

वीर धरणात १२ मिमी पावसाची नोंद झाली असून, धरण सध्या ५.३६७ टीएमसी (५७.०६%) भरले आहे. येथे ४३५ क्युसेक्स आवक सुरू आहे.

गुंजवणी धरणात आज ७२ मिमी पाऊस झाला असून, साठा १.१०१ टीएमसी (२९.८४%) आहे. येथे ८४ क्युसेक्स पाण्याची आवक आहे.



एकूण आवक आणि साठा:

चारही धरणांमध्ये आज सकाळपर्यंतची एकूण आवक ०.९३८ टीएमसी इतकी झाली आहे.निरा डावा आणि उजवा कालवे बंद आहेत तसेच सध्या कोणत्याही धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.