Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गिरवीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 


फलटण चौफेर दि २३ जून २०२५

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण, द्वारे आयोजित ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गिरवी येथे एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग या थीम खाली आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक श्री.दादासाहेब नरसिंगराव कदम यांनी मुलांना  दैनिक जीवनातील योगाचे महत्व सांगितले. तसेच काही आसनांचे प्रात्यक्षिकही करून दाखवले. याचबरोबर सात्विक आहाराबद्दलही मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम श्री छत्रपती शिवाजी  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक  श्री.संजयकुमार सावंत तसेच जिल्हा प्राथमिक केंद्राचे चे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय सुतार व सर्व शिक्षकवृंद  यांच्या उपस्थितीत पार पडला तसेच या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. व्ही. लेंभे व डॉ. ए. आर. पाटील आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. ए.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या तेजस्विनी कोकाटे,तनिष्का दौंडकर, समिक्षा लावंड, शिर्के श्रद्धा, स्नेहल क्षीरसागर, संध्या सुळ यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.