फलटण चौफेर दि ३० जून २०२५
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील उद्यानकन्यांद्वारे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत
गिरवी येथे माती व पाणी परिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. माती व पाण्याचे परीक्षण करणे शेतकऱ्यांसाठी काळाची गरज बनली आहे. माती व पाण्याची गुणवत्ता शेतकऱ्यांना समजल्यास पिकांच्या उत्पादन वाढीसाठी त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, असे मत माती व पाणी परीक्षण तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता मेटकरी-खरात यांनी व्यक्त केले.
तसेच शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकांचे वितरण व विश्लेषणही करण्यात आले.डॉ.प्राजक्ता खरात यांनी मातीचे आरोग्य याबद्दल माहिती देऊन मातीचा नमुना परीक्षणासाठी कसा गोळा करावा हे सांगितले.
या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण,कार्यक्रम अधिकारी,मा.प्रा.डॉ.जे.व्ही.लेंभे आणि मा.प्रा.डॉ.ए.आर.पाटील व कार्यक्रम समन्वयक मा.प्रा.ए.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या तेजस्विनी कोकाटे, तनिष्का दौंडकर ,समीक्षा लावंड, श्रद्धा शिर्के,स्नेहल क्षीरसागर,संध्या सुळ यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.