फलटण चौफेर दि ३० जून २०२५
फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत' कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत " सहभागी ग्रामीण मूल्यांकन या कार्यक्रमांतर्गत गावच्या सर्व सार्वत्रिक नकाशे, जलकुंभ व सरकारी कार्यालयांचे स्थापन साल, साक्षरता चार्ट ,वार्षिक पीक चार्ट ही सर्व माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली व ही सर्व माहिती रांगोळीच्या मदतीने रेखाटण्यात आली होती.या कार्यक्रमासाठी अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषिमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी . निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे , कार्यक्रम अधिकारी नीतिषा पंडित, प्रा. नीलिमा धालपे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या अश्विनी महानवर, पायल नाळे,वैष्णवी चांदगुडे , निधी कोडापे, आविष्का शिंदे, प्रचिती कुदळे, सेजल दांगट यांनी हा उपक्रम पार पडला.