Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वेळोशी परिसरात कृषीदुतांकडून 'कृषी तंत्रज्ञान अँप्स ' या विषयावर प्रात्यक्षिक सादर

 


फलटण चौफेर दि ३० जून २०२५

महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न,फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2025 अंतर्गत ' कृषी तंत्रज्ञान अँप्स '  प्रात्यक्षिक सादर करण्यात आले . यावेळी कृषीदुत चव्हाण अविनाश ,शिंदे रोहित, शिंदे आदित्य , शिंदे समाधान, चैतन्य बोडरे , पवार रोहन व दयासागर पाटील  यांनी विविध कृषी विषयक मोबाइल अँप्स या विषयावर प्रात्यक्षिक सादर केले . यावेळी त्यांनी ऍग्रो स्टार , प्लॅन्टिक्स , इ - पीक पाहणी , क्रॉप  डॉक्टर , किसान सुविधा , प्रधान मंत्री फसल बिमा योजना  या शेतकऱ्यांना बाबत  शेतकऱ्यांना माहिती दिली . यामध्ये या अँप्स शेतकऱ्यांना फायदे ‌व हे अँप्स वापरण्याची पद्धत याविषयी मार्गदर्शन केले .

 

यासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु.डी.चव्हाण , उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. सौ. एन.एस धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. श्री. एस. एम. साळुंखे व प्रा. सौ.एन. ए .पंडीत यांनी मार्गदर्शन केले .


या वेळी रामदास कदम , भगवान   काळे , शंकर कांबळे , राहुल कांबळे , रमेश जाधव, धनाजी चव्हाण , दौलत जाधव , नारायण जगताप , निवृती शिंदे  इत्यादी  शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.