फलटण चौफेर दि १३ मे २०२५
तब्बल १८ वर्षांपूर्वी २००७ साली निसर्ग हॉटेलच्या लगत छोट्याशा टपरीमध्ये निसर्ग पान नावाने आमच्याच गावातील नितीन व विशाल जगताप या बंधूंनी निसर्गपान शॉप या छोट्याशा टपरीची सुरुवात केली होती पान टपरी म्हणजे दुय्यम दर्जाचे काम अशी धारणा त्यावेळी होती मात्र जगताप बंधूंनी यावर मात करत कोणताही धंदा छोटा नसतो या उक्तीला जागून सुरुवातीला आलेला अत्यल्प प्रतिसाद स्वीकारून जीव ओतून काम करण्यास सुरुवात केली व त्यांच्या कष्टाने,कौशल्याने तयार केलेल्या मसाला पानाने सध्या फलटण तालुक्याबरोबरच जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील पान रसिकांची मने जिंकली असल्याचे प्रतिपादन तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी निसर्ग पान शॉप या नूतनीकरण केलेल्या नवीन शॉप च्या उद्घाटनाप्रसंगी केले
यावेळी सुरवडी गावचे माजी उपसरपंच बाळासाहेब जगताप,दिपक साळुंखे पाटील फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष संतोष पवार,ग्रामपंचायत सदस्य महेश साळुंखे पाटील,विकास सोसायटीचे माजी चेअरमन रमेश जगताप, ज्येष्ठ पत्रकार श्रीरंग पवार, जगताप कुटुंबिय व सुरवडी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते