फलटण चौफेर दि २२ मे २०२५
सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी तुषार जोषी यांची नियुक्ती झाली आहे या पदावर कार्यरत असलेले समीर शेख यांची बदली बृहन्मुंबई येथे उपायुक्त (DCP) म्हणून करण्यात आली आहे.
तुषार जोषी हे अत्यंत अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी याआधी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी यशस्वी कारकीर्द बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या अधिक मजबूत अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तर आगामी काळात जिल्ह्यात गुन्हेगारी नियंत्रण आणि जनतेच्या विश्वासार्हतेसाठी प्रभावी पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.