फलटण चौफेर दि २६ मे २०२५
फलटण तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अशातच कोऱ्हाळे ता फलटण येथील शेतकरी युवराज बुवासो शिंदे यांची तब्बल ९० हजार रुपये किमतीची मुरा जातीची दुभती म्हैस शेड कोसळून जागीच मृत्युमुखी पडली.
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जमिनी ओलावल्या असून, काही ठिकाणी शेडसारख्या संरचनाही कमकुवत झाल्या आहेत. युवराज शिंदे यांच्या शेतातील पत्र्याचे शेड अचानक कोसळले आणि त्याखाली असलेली म्हैस चिरडली गेली. या घटनेमुळे शिंदे कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
"शासनाने तत्काळ आर्थिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा," अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.