फलटण चौफेर दि २२ मे २०२५
फलटण तालुक्यांमध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचे लाभार्थीना जास्तीत जास्त फायदा कसा होईल व त्यामध्ये आडचणी सोडवण्यासाठी मा. खा रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील , जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, युवा नेते धनंजय साळुंखे पाटील यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेतली
ही योजना तालुक्यात प्रभावी पणे राबवा येणाऱ्या सर्व अडचणी सोडवल्या जातील हे सरकार गोर गरीबांचे काम करणारे सरकार आहे. जास्तीत जास्त लाभार्थी ना शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी माजी खा रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी लवकरच बांधकाम कामगार संघटना व लाभार्थी यांचा भव्य भांडी व शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाम कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगितले