फलटण चौफेर दि १३ मे २०२५
फलटण शहरातील गजानन चौकात गोल्डन बेकरीच्या शेजारी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या चक्री जुगार अड्ड्यावर फलटण शहर पोलिसांनी छापा टाकून १७ हजार १०० रुपयांचे जप्त करून जुगाराचे संशयित छोट्या उर्फ अब्दुल शेख रा गजानन चौक फलटण, किरण सुनील ननवरे रा झिरपे गल्ली फलटण, जुबेर ताजुद्दीन शेख रा गजानन चौक फलटण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे संशयित लोकांच्याकडून बेकायदा पैसे स्वीकारून एलईडी स्क्रीनवर चक्री नावाचा जुगार चालवीत असताना व खेळताना आढळून आले याबाबत पोलीस हवालदार चंद्रकांत दाबते यांनी फिर्याद दिली असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार बबन साबळे हे करत आहेत.