फलटण चौफेर दि १३ मे २०२५
भाजपाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारसंघासोबतच सातारा जिल्ह्यातील पक्ष वाढीसाठी आमदार अतुलबाबा हे महत्वपूर्ण योगदान देतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना असून त्यांच्या निवडीमुळे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासह सातारा जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे.