फलटण चौफेर दि २५ मार्च २०२५
फलटण तालुक्यातील एका गावामधील युवतीला दि.२० मार्च रोजी ४ वाजण्याच्या सुमारास विडणी ता. फलटण गावच्या हद्दीतून संशयित उदय जाधव (बंन्टी) रा हलगुडेवाडी ता कराड याने जबरदस्तीने त्याच्या गाडीवरुन कराडमधील श्री स्वामी समर्थ लॉजवर मनाविरुद्ध दि २० ते २३ मार्च दरम्यान तीन ते चार वेळा जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्याची फिर्याद पीडितेने फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात दिली असून संशयित उदय जाधव याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार नागवडे करीत आहेत