Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

धक्कादायक!शेअर मार्केटच्या अमिषाने साखरवाडी च्या व्यापाऱ्याला ४८ लाखांचा गंडा



फलटण चौफेर दि २८ नोव्हेंबर २०२४   ६ सप्टेंबर ते १८नोव्हेंबर २०२४ या कालावधीत साखरवाडी, ता. फलटण येथील किराणा दुकानदाराला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या अमिषाने सुमारे ४८ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी अभिजित अजित शहा (वय ४५, रा. साखरवाडी, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी दि. ६ सप्टेंबर ते १८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत शहा यांच्या मोबालवर आरोही शर्मा नावाने कॉल आला. आपण शेअर मार्केट अॅडव्हायझर आहे, असे सांगत पैसे गुंतवा तुम्हाला चांगला परतावा मिळेल असे सांगून त्यांनी व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवली व कॉल करून डिपॉझिट रक्कम, व्हीआयपी मेंबर फी व टॅक्स तसेच इतर अमिषे दाखवून ४८ लाख १२ हजार ३५३ असे वेगवेगळ्या १४ अकाउंट नंबरवरुन ट्रान्सफर करायला लावले. त्यानंतर कसलाही परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शहा यांनी पोलिसांत धाव घेतली. सहायक निरीक्षक वायकर तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.