Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राज्यातील सत्तापरिवर्तन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - खा. शरद पवार आ दीपक चव्हाण ,श्रीमंत संजीवराजेंचा हजारोंच्या साक्षीने पक्ष प्रवेश

 


फलटण चौफेर दि१५ :

      राज्यातील सत्तापरिवर्तन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, महाराष्ट्र निमार्ण करण्यासाठी जी चळवळ उभी राहिली त्या चळवळीतून कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्या सारखा तरुण कार्यकर्ता आमदार झाला ही फलटणची परंपरा आहे. याच चळवळीतून यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले याचा ठराव मनमोहन पॅलेस फलटणला झाला हे राज्य तयार करण्याच्या मध्ये फलटणकरांचे योगदान महत्वाचे आहे.  तुम्ही चिंता करू नका रामराजे इथं दिसत नसले तरी त्यांची मानसिकता काय आहे हे मी लोकसभा निवडणुकीत पाहिलं आहे. मागच्या दिवसात जे झालं ते झालं ते सगळं विसरून आपल्याला महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे असे सुतोवाच खा. शरद पवार यांनी केले. ते फलटण येथे जाहिर सभेत बोलत होते. यावेळी आ. दिपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केला.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,  मा. उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील, खा. अमोल कोल्हे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, आ. दिपक चव्हाण, कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, मा. आ. प्रभाकर घार्गे, अनिल देसाई, मा. आ. उत्तमराव जानकर, धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, जयकुमार इंगळे, रामभाऊ ढेकळे, अशोकराव लेंभे, सुनिल माने, यांच्यासह सातारा जिल्यातील विविध मान्यवर यावेळी उपास्थित होते. 

पुढे बोलताना खा. शरद पवार म्हणाले, पाच सहा महिन्यात पूर्वीच्या भेटी या मध्ये खूप फरक होता.  लोक आपले आहेत परंतू त्यांना अडचणी आहेत हे मला लक्षात आले. तुमच्या डोळ्यावरून तुमचं मन कळत तुमचे डोळे प्रफुल्लित आहेत डोळे बोलके आहेत.  आमचे संबंध अनेक वर्षांचे आहेत  लहानपणी मी फलटणला येत असे माझ्या आईची एका ठिकाणी श्रद्धा होती त्यामुळे मी आई बरोबर नदी ओलांडून फलटणला येत असे तेव्हा पासून फलटणचे आणि माझे नाते असल्याचे खा. पवार यांनी निदर्शनास आणून दिले. 

आज बारामतीचे चित्र वेगळे दिसते त्यात विकास दिसतो माळेगाव साखरकारखान्याचा पाया श्रीमंत मालोजीराजे यांनी भरला त्यामुळे बारामती च्या विकासात फलटणचा वाटा आहे.असे सांगतानाच पवार म्हणाले, स्वतःच्या बहिणी बद्दल आस्था ही असतेच म्हणून बहीण ही जिवाभावाची आणि सर्वात महत्वाची व्यक्ती असते म्हणून बहिणींचा सन्मान केला यात एक गंमत आहे बहीण दहा वर्षात आठवली नाही.  देवेन्द्र फडणवीस यांचं सरकार असताना बहीण आठवली नाही मात्र आताच्या सरकारला लोकसभा निवडणुकीतील अपयशा नंतर लाडक्या बहिणीची आठवण झाली ही शोकांतिका असल्याचे खा. शरद पवार म्हणाले.


प्रास्ताविकामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आम्ही जो तुतारी बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे तो कार्यकर्त्यांच्या विचारातून व त्यांच्या दबावापोटी घेतलेला असून कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न तालुक्यातील विरोधकांनी केलेला आहे. महायुतीत असताना सुद्धा आम्हाला विचारात घेतले जात नसल्याने आम्ही लोकसभेला विरोधात काम केले कार्यकर्त्यांवरील होत असलेल्या अन्यायाविरोधात आम्ही कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करूनच खासदार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता निर्णय घेतला असताना कार्यकर्त्यांनी कमी पडू नये विधानसभेला तुतारी आलीच पाहिजे असे आवाहन संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.