फलटण चौफेर दि १७ साखरवाडी ता फलटण गावातील बाजारपेठेमध्ये असणाऱ्या जमिनींचा भोगवटा वर्ग हा २ वरून १ करावा महाराष्ट्र शासनाने सन २००० साली या संदर्भात शासनादेश काढला होता मात्र याची अंमलबजावणी अद्याप झाली नसून बाजारपेठेतील अशा जमिनी भोगवटादार एक वर्ग होण्यासाठी आपण लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी साखरवाडी व्यापारी असोसिएशनच्या वतीने विधान परिषदेचे माजी सभापती आ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २००० सालचा शासनादेश असून सुद्धा अजून पर्यंत बाजारपेठेतील या जमिनी भोगवटा वर्ग एक झाल्या नसून त्या व्हाव्यात तसेच साखरवाडीतील बाजारपेठेमधून जाणाऱ्या रस्त्याची सद्यस्थितीत अत्यंत दयनीय अवस्था झाली असून हा रस्ता सुस्थितीत करावा त्याचप्रमाणे गावची लोकसंख्या व औद्योगीकरण वाढत असताना पिण्याच्या पाण्याची जी साठवण क्षमता आहे यामध्ये सुद्धा वाढ होऊन साखरवाडीला होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वाढवावा व हे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची मागणी निवेदनामध्ये केली आहे यावेळी फलटण तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सतीश माने, साखरवाडी व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद जाधव, सुनील माने,माजी उपसरपंच समीर भोसले, सचिन गांधी, स्वप्निल शहा परेश शहा, भारत व्होरा, युवराज रणवरे उपस्थित होते