फलटण चौफेर दि १२
सत्तेसाठी फलटण तालुक्याच्या हक्काचे पाणी बारामतीला विकून फलटण तालुका गुलाम राहिला पाहिजे याची दक्षता घेण्याबरोबरच राजेशाही राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न तिघा राजे बंधूनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचे व त्यांनी पोसलेल्या गुंडांचे कारनामे चौका चौकात दाखविणार असल्याचा इशारा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल च्या मैदानावर आयोजित लाडकी बहीण योजना सन्मान सोहळा व महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना दिला आज नवरात्री आहे त्यामुळे स्त्री रूपातील तमाम नारीशक्तीचा सन्मान महाराष्ट्र सरकारने केला आहे याचा मला आनंद आहे य फलटण तालुक्यात सर्व ठिकाणी परिवर्तनाचं वार वाहत आहे त्यामुळे परिवर्तनाच्या या लढाईत माझ्या बहिणींची साथ मला हवी आहे असेही निंबाळकर म्हणाले
यावेळी फलटण तालुक्याचे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील , भाजपाचे विधानसभा उमेदवार सचिन कांबळे पाटील , शिवरूपराजे खर्डेकर , माणिकराव सोनवलकर , जयकुमार शिंदे , विश्वासराव भोसले , समशेरसिंह ना निंबाळकर , धंनजय साळुंखे पाटील विराज खराडे, ऍड जिजामाला ना निंबाळकर मनीषाताई ना निंबाळकर, अमरसिह ना निंबाळकर नानासाहेब इवरे ,तुकाराम शिंदे, अशोक जाधव, सचिन अहिवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बोलताना रणजितसिंह म्हणाले, व्यासपीठावरील माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या साक्षीने सांगतो पुढील वर्ष हे खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान करणारे वर्ष ठरणार आहे संसदेत महिलांना तीस टक्के आरक्षण आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थात पन्नास टक्के आरक्षण आहे त्यामुळे "नारायणी नमोस्तुते " प्रमाणे सर्व महिलांना आम्ही सर्व वंदन करत आहोत सचिन कांबळे पाटील यांना आपण उमेदवार म्हणून घोषित करतोय त्यांना या लढाईत साथ द्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयकुमार शिंदे यांनी केले