फलटण चौफेर दि १८
फलटण तालुक्यामध्ये तात्पुरता फटाका स्टॉल परवान्यासाठी २५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार असून ज्या इच्छुकांना तात्पुरत्या फटाका स्टॉल साठी परवाना हवा आहे अशा व्यवसायिकांनी सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर पोलीस निरीक्षक फलटण शहर/ग्रामीण/लोणंद यांचेकडील नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करून फलटण तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार यांच्याकडे अर्ज करावा दिनांक २५ऑक्टोंबरनंतर आलेल्या अर्जाचा अथवा या दिनांकापूर्वी त्रुटी पुर्तता न करणा-या अर्जाचा परवान्यासाठी विचार केला जाणार नसल्याचे तहसीलदार डॉ अभिजीत जाधव यांनी सांगितले सर्व इच्छुकांनी विहीत मुदतीत अर्ज करुन परवाना प्राप्त करुन घ्यावा तसेच असा परवाना दिलेनंतर दिलेल्या परवान्यातील सर्व अटी-शर्तीचे कटाक्षाने पालन करावे तसेच आपल्या दिलेल्या परवान्याची प्रत ही आपल्या दुकानात सर्वांना दिसेल अशा प्रकारे लावावी, आणि अग्नीशमन यंत्रे देखील दुकानात उपलब्ध ठेवावीत.कोणत्याही व्यक्तीने रितसर परवाना घेतल्याशिवाय अथवा ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी फटाके विक्री केलेस सदर फटाके जप्त करुन त्यांचे दुकान सील करुन त्यांचेवर गुन्हा नोंद करणेत येईल तसेच महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ याची आचारसंहिता सर्वत्र लागू असलेने त्याचा कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही याची दक्षता देखील सर्व स्टॉलधारक व नागरिकांनी घ्यावी असे आवाहन तहसीलदार डॉ अभिजीत जाधव यांनी सांगितले आहे