फलटण चौफेर दि १२ : तालुक्याचे ज्येष्ठ उद्योजक श्रीमंत बंटीराजे खर्डेकर - निंबाळकर यांचे पुणे येथे निधन झाले असून उद्या दि.१३ रोजी सकाळी ८वाजता फलटण येथील "भवानी हाऊस" येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता फरांदवाडी येथील "श्री साईराजा फूड पार्क" येथे अंत्यसंस्कार संपन्न होणार आहेत.ज्येष्ठ उद्योजक श्रीमंत बंटीराजे खर्डेकर - निंबाळकर हे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष श्रीमंत दादाराजे खर्डेकर - निंबाळकर यांचे बंधू तर आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सासरे होत.