प्रतिनिधी नवनाथ गोवेकर लोणंद शहरातील फलटणला जाणाऱ्या पुलावर पवनचक्की चे साहित्य घेऊन जाणारा अवजड कंटेनर बंद पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आज लोणंद चा आठवडे बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यातच वाहतूक ठप्प झाल्याने वाहन चालक चांगलेच हैराण झाले आहेत. लोणंद मध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वच रस्त्यावर वाहतूक ठप्प आहे. याठिकाणी लोणंद पोलिस प्रशासन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे