फलटण चौफेर दि ६
फलटण ग्रामीण पोलिसांनी ट्रॅक्टर व दुचाकी चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला असून तिघा संशयतांना अटक केली आहे संशयित सुरज शंकर मदने वय ३५,अनिकेत महेश जाधव वय २० दोघेही राहणार सगोबाचीवाडी पणदरे ता बारामती व राजेंद्र मारुती जाधव वय ३० रा ढाकाळे यांना अटक केली असून त्यांच्याकडून ट्रॅक्टर चोरीचे ७ व मोटार सायकल चोरीचा १ असे एकुण ०८ गुन्हे उघडकीस आणून एकुण ६४लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार,
१५सप्टेंबर रोजी फिर्यादी विजय दिपक राजेपांढरे, रा. लक्ष्मीनगर, फलटण यांचे मालकीचा, ६ लाख रुपये किंमतीचा, महिंद्रा अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर सोमंथळी, ता. फलटण येथुन चोरी झाल्याची घटना घडली होती अलिकडच्या काळामध्ये फलटण तालुका व परिसरामध्ये ट्रॅक्टर चोरीच्या अनेक घटना सातत्याने घडत होत्या. पोलीसांनी या सर्व घटनांचा बारकाईने व सखोल अभ्यास केल्यावर असे निदर्शनास आले की, संशयित आरोपींनी पहिल्यांदा चोरी करावयाच्या ट्रॅक्टरचे पार्किंगचे ठिकाण व ट्रॅक्टरची चोरी केल्यानंतर तो घेऊन जाण्याचा मार्ग याची रेकी करुन नंतर ट्रॅक्टरच्या चो-या केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीसांनी फलटण तालुक्यानध्ये अशा प्रकारच्या चो-या झालेल्या ठिकाणांवरील सी. सी. टी. व्ही, कॅमेरे फुटेज व तांत्रिक माहितीचा अभ्यास करुन संशयिताना अटक करून मुद्देमाल जप्त केला संशयित सुरज शंकर मदने यांचा पुर्वेतिहास पडताळून पहाता चोरी, फसवणुक, पुरावा नाहीसा करणे, चोरीच्या उद्देशाने एकत्र जमणे अशा प्रकारच्या एकुण १८ गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग उघड झाला आहे.