फलटण चौफेर दि १० कापडगाव ता. फलटण हद्दीतील शासकीय गोदामातील धान्य चोरी करणाऱ्या टोळीच्या लोणंद पोलिसांनी मुसक्या आवळून संशयित दत्तात्रय मारुती सरक वय २८ वर्षे रा. पाडेगाव ता. फलटण,वैभव गोपाळ गोवेकर वय २२ वर्षे रा. कोरगाव ता. फलटण व अजिंक्य उर्फ परश्या अरुण जाधव वय १९ वर्षे रा. कोरेगाव व एक अल्पवयीन यांना अटक केली आहे याबाबत लोणंद पोलीस स्थानकातून मिळाले अधिक माहितीनुसार संशयितांनी शासकिय गोदामातील धान्याची १० पोती व वजने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल व दोन मोटार सायकली असा एकुण ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा. सर्जेराव सुळ, नाळे, नलवडे (जिविशा बीट), विजय पिसाळ, नितीन भोसले, विठ्ठल काळे, केतन लाळगे, गोविंद आंधळे, अंकुश कोळेकर, अभिजीत घनवट, संजय चव्हाण तसेच होमगार्ड सचिन निकम, रब्बानी शेख, हेमंत कारंडे, रवि व्हटकर यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन गुन्ह्याचा तपास सपोफी दिलीप येळे हे करीत आहेत.