फलटण चौफेर दि २० कराड शहर पोलीस ठाणे पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी दरोड्यासारखा गंभीर गुन्ह्याची उकल करत १० आरोपींना अटक केली असून या गुन्ह्यातील रोख रक्कम २,८९,३४,००० रुपये हस्तगत केल्याची माहिती सातार पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.या गुन्ह्यामध्ये आसिफ सलीम शेख रा. शिंदे गल्ली कराड, सुलताना शकील सय्यद रा. मंगळवार पेठ कराड, अजमेर उर्फ अज्जू मोहम्मद मांगलेकर (वय ३६) गोळेश्वर कार्वेनाका कराड, नजर महंमद आरिफ मुल्ला (वय ३३) रा. रविवार पेठ कराड, ऋतुराज धनाजी खंडग (वय २९), ऋषिकेश धनाजी खंडग (वय २६) अक्षय अशोक शिंदे (वय २९) रा. तांबवे, करीम अजीज शेख (वय ३५) मंगळवार पेठ कराड, नजीर बालेखान मुल्ला (वय ३३) रा. सैदापूर, शैलेश शिवाजी घाडगे (वय २४), अविनाश संजय घाडगे (वय २९) रा. निमसोड यांना अटक केल्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की १५ ऑक्टोबर रोजी रात्री १:२० च्या सुमारास पुण्याकडून हुबळीकडे जाणाऱ्या चारचाकीतून कराड मध्ये ३ कोटी रुपयांची रोख रक्कम चारचाकी वाहनातून चक१२ चङ६००५ घेऊन कराड गावच्या हद्दीत एका पांढऱ्या रंगाची चारचाकी पाठलाग करुन मलकापुर ता. ढेबेवाडी फाट्याच्या पुढे आडवी मारुन वाहनातून दोन अनोळखी मुले खाली उतरली. आणि दुचाकी मोटार सायकलवरून आणखी दोन अनोळखी इसम असे उतरले. त्यापैकी एकाने हॉकी स्टिकने क्लिनर साईटची काच फोडली. तसेच त्या चारचाकी वाहनाचा दोन इसमांनी गाडी का दाबली असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केली. त्यापैकी एकाने फिर्यादीला लाथाबुक्याने मारहाण करत तसेच जीवे मारण्याच्या भीतीने गाडीत असणारी ३ कोटींची रक्कम चोरुन नेल्याचे फिर्यादीने सांगितले.यावेळी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून त्या परिसरातील माहिती घेतले असता त्यांना सुरुवातीला एक आरोपी मिळाला तर नंतर दोन महिला सुद्धा मिळाल्या त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तात्काळ हे सर्व एकत्र मिळून चोरी केल्याची माहिती दिली अशी माहिती समीर शेख यांनी दिली. तपासाकामी या कामगिरीमध्ये सपोनि बधे, फाणें, तारु, भाटकर, माळी, मसपोनि जाधव, आवंले, वाघमोडे, शितल माने, पोउपनि शिंगाडे, दिसले, भंडारे, मगदुम अशोक वाडकर, अमोल साळुंखे, सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे शरद बबले शाबीर मुल्ला प्रवीण फडतरे मंदिर मुल्ला पृथ्वीराज जाधव मोहन पवार अमित माने यांनी सहभाग घेतला.