विडणी (योगेश निकाळजे) - विडणी येथील प्रसिद्ध युवाउद्योजक राकेश प्रशांत ननावरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गुरुवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे विडणी ता.फलटण येथील प्रसिद्ध युवा उद्योजक राकेश प्रशांत ननावरे यांचा गुरुवार दि.३ऑक्टोंबर रोजी वाढदिवस साजरा होत असून त्यांच्या या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शिव फिटनेस क्लब यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये युवावर्गाने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही क्लबच्यावतीने करण्यात आले आहे,या शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहे.भव्य रक्तदान शिबिर हे गुरुवार दि.३ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिव फिटनेस क्लब विडणी येथे होणार असून या कार्यक्रमास गावातील मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.