गोखळी प्रतिनिधी फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील तिरंगा पब्लिक स्कूल गोखळी ता.फलटण येथे शिकणाऱ्या कुमारी स्वरा योगेश भागवत वय ११ वर्ष हिने बारामती येथे झालेल्या खेलो इंडिया अंतर्गत सायकलिंग स्पर्धेत १५ वर्षाखालील गटात गोल्ड मेडल पटकावल याआधी स्वराने सहाव्या वर्षी एका मिनिटात १०० पुश्य अप्स, ५० प्रकारचे रोप जम्प, प्राणायाम, योगासने, प्लस,स्वीमिग अडीच वर्षाची असताना पोहायला शिकली आहे.नियमित व्यायाम करण्यात तरबेज आहे. सहाव्या वर्षी १४३ किलो मीटर गोखळी, बारामती, मोरगाव, जेजुरी,निरा, लोणंद, फलटण,राजाळे,गोखळी असा सायकल चालविण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. महाराष्टातील सर्वात उंच कळसुबाई शिखर एक तास छप्पन मिनिटांत लहान वयात सर करणारी स्वरा भागवत एकमेव मुलगी आहे.तिची या विक्रमी कामगिरीची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.या वेळी स्वरा चा सत्कार जय दादा पवार तसेच महाराष्ट्र सायकलिंग फेडरेशनचे चिफ प्रताप जाधव सर तसेच इतर मान्यवर उपस्तित होते…कुमारी स्वरा भागवत चे फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी आणि पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.