फलटण चौफेर दि ६
नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असल्याने आज दिनांक ६ रोजी दुपारी २ वाजता वीर धरणाच्या सांडव्याद्वारे सुरु असलेला ४६३७ क्युसेक्स एवढा विसर्ग कमी करून तो आता ०.०० क्युसेक्स करण्यात आला आहे.पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता यांनी केले आहे