फलटण चौफेर दि ६
माळजाई मंदिराच्या पाठीमागे डेक्कन चौकाकडे जाणारे कच्चे रोडवरून दिनांक ४ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला फिर्यादी श्रीमती माया काशिनाथ रोकडे (वय-५२ वर्षे, रा. मंगळवार पेठ, समाजमंदिर जवळ, फलटण) जात असताना अंदाजे २० वर्षे, काळा टी शर्ट घातलेला तरुण, अंगाने सडपातळ असलेला व तों डास रुमाल बांधलेला व मोटार सायकल चालक तरुण त्याचे अंगामध्ये लायनिंगचा पांढरा हिरवा शर्ट घातलेला, वय अंदाजे २० वर्षे असलेला व डोक्यात हेल्मेट असलेला या दोन अनोळखी तरुणांनी यांनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील ७ हजार रुपये किमतीचे एक गळ्यातील काळे मणी असलेले मणीमंगळसुत्र खेचुन, ओढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार माधवी बोडके करत आहेत.