साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
सुरवडी ता फलटण येथून दिनांक १३ रोजी सायंकाळी ५ ते दि १४ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रेल्वे लाईन येथील ट्रांसफार्मर चोरी झाल्याची घटना घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी सुरवडी येथील रेल्वे नामक १०० एचपी क्षमतेचा डीपी अज्ञात चोरट्यांनी काल रात्री चोरून नेल्याची घटना घडली आहे सध्या पावसाने उघडीप दिल्याने उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आडसाली उसाची लागण,बाजरी,सोयाबीन, कांदा व इतर पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंपाचा वापर करत आहे मात्र डीपी चोरी झाल्याने शेतकऱ्यांपुढे आता नवीनच संकट उभे राहिले आहे