फलटण चौफेर दि १३
ठाणे शहरचे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांची साताऱच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई शहराच्या उपायुक्त पदी बढती झाली आहे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत आज राज्यातील १७ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यामध्ये सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलीस अधीक्षक आचल दलाल यांची सुद्धा बदली करण्यात आली आहे अतिरिक्त पोलीस आयुक्त आचल दलाल यांची राज्य राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक पदी पुणे येथे बदली करण्यात आली आहे