Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मोटार सायकल व विहीरिवरील मोटारी चोरी करणा-या टोळीच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या



फलटण चौफेर दि १५ - मोटार सायकल व विहीरिवरील मोटारी चोरी करणाऱ्या  टोळीच्या लोणंद पोलीसांनी मुसक्या आवळल्या असून पाच पैकी दोन आरोपींना अटक केली असुन सुमारे १ लाख १० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .

  लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांच्या मोटार सायकली व शेतक-यांच्या विहीरिवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरी झालेबाबत गुन्हे दाखल झाले होते.  लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशिल भोसले,  व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर घडणा-या गुन्हयांबाबत गोपणीय खब-यांमार्फत माहीती मिळवुन मिळाले माहीतीचे आधारे यातील संशयीत आरोपी धिरज संजय गिरी वय २६ रा. बोरी ता. खंडाळा , अनिकेत जालिंदर येळे वय २१ रा. ठोंबरे मळा, लोणंद ,रोहित सदानंद शेळके वय २१ वर्षे रा.निंबोडी ता. खंडाळा , ओम प्रकाश माने वय २० वर्षे रा.विर ता. पुरंदर जि.पुणे , जयेश आनंदा मलगुंडे वय २६ वर्षे रा. कापडगाव ता. फलटण ,ओम मोहीते रा. तांबवे ता. फलटण यांना निष्पन्न केले.

  संशयीत आरोपी हे सासवड ता. पुरंदर येथे असल्याबाबत माहीती मिळाल्याने  सपोनि सुशिल भोसले व गुन्हे प्रकटीकरण पथकाने धिरज संजय गिरी ,अनिकेत जालिंदर येळे ,रोहित सदानंद शेळके , ओम प्रकाश माने आरोपींना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले. त्यांचेकडे अधिक विचारपुस केली असता त्याने व त्याचे साथीदारांनी मिळून लोणंद पोलीस ठाणेचे हद्दीत खालील प्रमाणे मोटार सायकल चोरीचे २ व विहीरिवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरीचे ३ गुन्हे केल्याची कबुली दिली असुन आरोपींकडुन मोटार सायकली व इलेक्ट्रीक मोटारी असा एकुण १,०७,०००/- (एम लाख सात हजार रु) किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

या गुन्ह्यातील जयेश मलगुंडे ,ओम मोहीते आरोपी फरारी आहेत .

 या गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक  आंचल दलाल , उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि  सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा. संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे, अभिजित घनवट ,पोहवा. संजय बनकर यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.