Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खुल्या प्रवर्गातील मुलां-मुलींना शासनमान्य कॉम्प्युटर टायपिंग ३ कोर्स मोफत साखरवाडीतील श्री जोगेश्वरी कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश सुरू

 


फलटण चौफेर दि ६
महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारा शासनमान्य कॉम्प्युटर टायपिंग (जीसीसी-टीबीसी) हा ६ महिन्याचे ३ कोर्स आपल्या साखरवाडी व फलटण तालुक्यातील ब्राम्हण, राजपूत, मारवाडी, राजपुरोहित, येलमार समाजातील मुलां-मुलींना १०० टक्के विनामुल्य शिकण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अमृतचा लक्षगट की ज्या खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळ मार्फत समकक्ष योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षीत गटातील जातींचा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत असे उमेदवार की ज्यांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनविणे असा आहे. अमृतच्या लक्षीत गटात ब्राम्हण, बनिया, वंत्स, कम्मा, कायस्थ, कोमटी, ऐयांगर, नायर, नायडू, पाटीलदार, बंगाली, पटेल, राजपूत, येलमार, मारवाडी, ठाकूर, त्यागी, सेनगनथर, वैश्य, राजपुरोहित, गुजराथी इत्यादी जातींचा समावेश आहे.

कॉम्प्युटर टायपिंग कोर्सचे प्रशिक्षण विनामुल्य पूर्ण करण्यासाठी निवड प्रक्रिया अशी असेल. सदर प्रशिक्षणार्थ्यांनी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे स्वयंघोषणापत्र व संस्थाचालकाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची स्व:साक्षांकित प्रत सादर करणे बंधनकारक राहील. त्याच बरोबर संस्थेमध्ये अभ्यासक्रमांसाठी जमा केलेल्या फी/शुल्काची स्व:साक्षांकित पावती आवश्यक आहे. उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशिल (बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, आयएफएससी कोड) व रद्द झालेल्या चेकची प्रत जोडावी.

अमृच्या लाभार्थी निकषांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांनी विहीत नमुन्यामध्ये अमृत संस्थेच्या www.mahaamrut.org.in व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे / दस्तऐवज अपलोड करावेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) कॉम्प्युटर टायपिंग मराठी, हिंदी, इंग्रजी ३० व ४० शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण होतील त्यांना एकरकमी रुपये ६५००/- (अक्षरी रुपये सहा हजार पाचशे फक्त) प्रोत्साहानात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. त्याच बरोबर मराठी / हिंदी लघुलेखन ६०, ८०, १००, १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी ६००, ८०, १००, १२०, १३०, १४०, १५०, १६० शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एकरकमी रुपये ५३००/- (अक्षरी रुपये पाच हजार तीनशे फक्त) प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. सदरची रक्कम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जाईल. या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी अनुज्ञेय राहणार नाही.

तरी साखरवाडी व परिसरातील वरील समाजातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मान्यताप्राप्त असलेल्या श्री जोगेश्वरी कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिटयूट साखरवाडी मध्ये आजच संपर्क साधावा असे आवाहन अमृत योजनेचे सातारा जिल्हा समन्वयक  श्री प्रशांत सुतार साखरवाडी येथील श्री जोगेश्वरी कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिटयूटचे  सचिन जगताप (9689968911) यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.