Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वडगाव निंबाळकर पोलिसांनी टिपर चोरट्याच्या २४ तासात आवळल्या मुसक्या!

 


फलटण चौफेर दि २२

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील वडगाव निंबाळकर ता. बारामती जि.पुणे गावचे हददीतील गालींदे यांचे पेट्रोल पंपातील मोकळे जागेतुन दि.१९ रोजी रात्रीच्या वेळी लालासाहेब पंडीतराव दरेकर रा वडगाव निंबाळकर ता बारामती यांनी त्यांचे मालकीचा टिपर टाटा कंपनीचा १६१८ एल.पी. के हायवा ट्रक नं एम.एच. १७ बी. वाय. ६२९६ हा चोरी झाला. 

         सदर गुनहयाचे तपासात गापेनीय माहीती व तांत्रिक माहीतीचे आधारे चोरीस गेलेले टीपरचा शोध घेतला असता सदरचा टिपर हा सालपे ता. फलटण जि. सातारा गावचे हददीत पाठलाग करून पकडला असुन टिपर निलेश विठठल भंडलकर रा. चोपडज पर्णकुटी ता. बारामती जि. पुणे, नामदेव तानाजी चव्हाण रा. चव्हाणवाडी ता फलटण जि. सातारा हे दोघे मिळुन आले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर टिपर चोरी केलेचे कबुल केले आहे. पोलिसांनी निलेश विठठल भंडलकर रा. चोपडज पर्णकुटी ता. बारामती जि. पुणे, नामदेव तानाजी चव्हाण रा. चव्हाणवाडी ता फलटण जि. सातारा यांना अटक केली आहे.सदरची कामगिरी ही  पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, रमेश चोपडे अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग, सुदर्शन राठोड उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोसई पांडुरंग कन्हेरे, महेश पन्हाळे, अनिल खेडकर, पो. ना भाउसो मारकड, कुडलीक कडवळे, पोपट नाळे, हृदयनाथ देवकर, नागनाथ परगे यांनी केलेली आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास पो हवा महेश पन्हाळे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.